जलयुक्त शिवार-2च्या प्रभावी अंमलबजावणी स्वंयसेवी संस्थाचा सहभाग घ्यावा-शिवराम राऊत

जलयुक्त शिवार-2च्या प्रभावी अंमलबजावणी स्वंयसेवी संस्थाचा सहभाग घ्यावा-शिवराम राऊत
शिरूर/प्रतिनिधी
आज.दि.23.डिसे.रोजी श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिवरसिंगा ता.शिरुर यांच्या वतीने अध्यक्ष-श्री.शिवराम सुधाकर राऊत यांनी मा.जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासनाने दि.१३डिंसेबर २०२२च्या मंत्रीमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार-2 हि योजना राबविण्याचा निर्णय मृदा-जलसंधारण विभागाच्या वतीने घेतला आहे.या बाबतीत राज्यभरातील गावातील शेतकरी यांनी स्वागत केले आहे.सन २०१५ ते २०१९या मधील जलयुक्त शिवार-१ योजनेतील त्रुटी व महत्त्वाचे बदल करूण राबवण्याचा निर्णय घेतला.या साठी सर्वप्रथम बैठक हिरवेबाजार येथे श्री.एकनाथरावजी डवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत जलयुक्त शिवार-२या योजनेतील त्रुटी,करावयाची कामे, कालावधी, अंमलबजावणी, संबंधित चर्चा झाली.
जलयुक्त शिवार-2च्या प्रभावी अंमलबजावणी साठी स्वंयसेवी सेवाभावी संस्था चां सहभाग असावा या संबंधीची मागणी श्री.शिवराम राऊत यांनी व्यक्त केले.कारण सामाजिक जाणीव -जागृती,लक्षगट सक्षम करण्याची कामे करतात.त्या मुळे काहीतरी सहकार्य होईल व या योजनेचा फायदा चांगला होईल.प्रभावीपणे राबविण्यात येणार म्हणून शासनाने या योजनेचा प्रत्यक्षपणे अंमलबजावणीत सेवाभावी संस्था कमीतकमी ५०% सहभाग घ्यावा.क्षमता बांधणीचे १००% कामे देण्यात यावीत.
जलयुक्त शिवार योजनेतील स्वंयसेवी सेवाभावी संस्था चां सहभाग नसल्याने सर्वच कामे ठेकेदार पध्दतीने राबविण्यात आली.काही कामे अर्धवट झाली, भ्रष्टाचार झाला, कामांचा दर्जा ढासळला
हे टाळण्यासाठी सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेतले जावे या साठी श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचे निवेदन मा.ना.श्री.ना.एकनाथरावजी शिंदे (मुख्यमंत्री तथा मंत्री जल व संधारण विभाग) राज्याचे कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालयात सादर होणार आहे व जलयुक्त शिवार-२या योजनेतील प्रशासकीय खर्च देऊन सहभागी करून घेतले जावे.
