एसटी बसने तिघा तरुणांना चिरडले; बीड तालुक्यात दुर्दैवी घटना

Beed

एसटी बसने तिघा तरुणांना चिरडले; बीड तालुक्यात दुर्दैवी घटना

बीड प्रतिनीधी 

बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ आज सकाळी पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या पाच जणांवर दुर्दैवी काळ आला. रनिंग प्रॅक्टिस करत असताना बीड-परभणी एसटी बसने या तरुणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.

अपघातात मृत झालेल्यांमध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रूवान घोडके (वय १९), आणि ओम सुग्रीव घोडके (वय २०) यांचा समावेश आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बीड-परभणीकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने येऊन रनिंग करत असलेल्या या तरुणांना धडकली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेचा अधिक तपास पोलिस करतआहेत.

Sharing

Visitor Counter