ग्रामीण भागाचा रेशन गायब?

ग्रामीण भागाचा रेशन गायब?
बीड/वार्ताहर
तालुका पुरवठा विभागामधील अनागोंदी कारभार नेहमीच चर्चेचा विषय बनतो कधी चलन तर कधी धान्य गायब तर कधी शिधापत्रिका चोरीचा विषय किंवा ऑनलाईन डाटा ईंट्री असेल अशे वेगवेगळे प्रकरण नेहमीच तहसील कार्यालयात पाहण्यास मिळते.नेहमीच चर्चेत असणाऱ्या या पुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आल्यासारखा पाहाण्यास मिळत आहे कारण ग्रामीण भागाचा रेशन अद्यापही आला नसल्याची चर्चा असून हा रेशन सर्रास पणे काळ्याबाजारात विकला की काय? अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
कुठे धान्य कमी दिले जात आहे तर कुठे धान्याची चोरी होत आहे. दुकानातून चोरी होत असल्याचे पुढे आल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला परंतु गोडाऊन मधूनच वेळेवर धान्य मिळाले नाही की धान्य दुकानदाराने वाटप केले नाही हे पाहणे गरजेचे बरोबरच यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
धान्य काळ्याबाजारात जात असल्याचे अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर येते ही खूप गंभीर बाब आहे परंतु याचा तोटा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर भोगाव लागत आहे. असाच काहीसा प्रकार ग्रामीण भागातून ऐकण्यास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ ग्रामीण भागात धान्य वाटप करावा अशी मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे.
