बार्शी नाका चौकात लाईट नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता!

Beed

बार्शी नाका चौकात लाईट नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता!

न.प कर्मचाऱ्यांनी तात्काळ लाईटी चालू करण्याची मागणी

बीड/वार्ताहर

बीड शहरात होत असलेल्या इस्तेमासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येत मुस्लिम समाजातील बांधव येत आहेत यांच्या मदतीसाठी मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येत बांधव मदत करताना दिसत आहेत. येणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून काही बांधव बार्शी नाका चौकात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भर चौकात लाईट नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून भरधाव येणाऱ्या गाड्यांमुळे या बांधवांचा जीव धोक्यात आल्याचे दिसते.

मुस्लिम बांधवांच्या बीड शहरातील नगररोड लगत होत असलेल्या इज्तेमाला आजपासून उत्साहात सुरवात झाली आहे. इज्तेमासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव दाखल झाले आहेत. इज्तेमासाठी येणाऱ्या मुस्लिम नागरिकांना मार्ग दाखविण्यासाठी रस्त्या - रस्त्यावर शिस्तबद्ध पध्दतीने स्वयंसेवक तरुण उभे ठाकले असून ठिक-ठिकाणी आलेल्या बांधवांसाठी नाष्टा- पाण्याची मोफत सोय देखील करण्यात आली आहे. मुसलमान बांधवांकडून नागरिकांना मार्ग दाखवण्यासाठी रात्र रात्र  स्वयंसेवक तरुण जागून काळत आहेत जाता वेळेस मोठी गर्दी होईल वाहने निघायला रात्र होईल.परंतु बार्शी नाका चौकात अंधार असल्यामुळे बांधवांना मोठी अडचण निर्माण झाली आहे यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या चौकातील लाईटी चालू करून द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

Sharing

Visitor Counter