मिलिंद मस्के यांची काँग्रेसच्या बीड शहर उपाध्यक्ष पदी आपल्या निवडी

मिलिंद मस्के यांची काँग्रेसच्या बीड शहर उपाध्यक्ष पदी आपल्या निवडी
बीड/प्रतिनिधी
दि. 3 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे आदेशानुसार शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांनी मिलिंद मस्के यांची बीड शहर उपाध्यक्ष पदी निवड केली आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय मलीक अर्जुन खड़गे, सोनिया गांधी व राहुलजो गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, बीड जिल्हा प्रभारी देविदास भन्साळी, बीडच्या नेत्या आदरणीय सौ. रजनीताई पाटील खासदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य हे विद्यमान भाजप सरकारच्या जातिय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या धोरणावर तसेच सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या गंभीर विषयावर जागृकता निर्माण करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. धर्मनिरपेक्ष आणि सर्व समावेशक विकास देणारे कांग्रेस सरकार राज्यात व देशात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
आपण ही कांग्रेसच्या मार्फत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल याची मला खात्री आहे. काँग्रेस पक्षाचे मलीक अर्जुन खड़गे व आपले लाडके नेते राहुल गांधीजी व सोनीया गांधीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सर्व सामान्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत घ्याल अशी आशा व्यक्त करतो. मिलिंद मस्के यांची निवड करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांच्यासह अमजद भाई,सुरुखान काँग्रेसचे समाजसेवक देविदास जंगले पदाधिकारी उपस्थित होते.
