लोकसेना संघटनेचे आव्हान इक़बाल टीपू आज़ाद समाजी-तहेज़ीबी कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा-ॲड. प्रा. इलियास इनामदार 

Beed

लोकसेना संघटनेचे आव्हान इक़बाल टीपू आज़ाद समाजी-तहेज़ीबी कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा-ॲड. प्रा. इलियास इनामदार 

बीड/प्रतिनिधी

देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव साजरा होणार आहे नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांची जयंती आहे, दहा नोव्हेम्बरला इंग्रजांचे कर्दनकाळ शहीद ए आज़म हज़रत टीपू सुलतान रहेमतुल्लाह अलैह यांची जयंती आहे व अकरा नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्रता सेनानी देशाची एकता अखंडता कायम राखणारे व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती आहे या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना व शहीद टीपू सुलतान उत्सव समिती च्या वतीने इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करणार अशी माहिती समिती निमंत्रक व लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार व जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी पत्रकार परिषद घेवून प्रसिद्धी माध्यमाद्वारे माहिती दिली आहे.

     सविस्तर असे की या तिन्ही महान स्वतंत्रता सेनानी यांच्या जयंती निमित्त लोकसेना संघटना ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करणार जसे 9 नोव्हेम्बरला सायं. 6 वाजता मिल्लिया कॉलेज ऑडोटोरियम हॉल किल्ला मैदान येथे उर्दू मुशायरा होणार आहे यामध्ये देशातील नावाजलेले शायर कवि येणार आहे. 10 नोव्हेम्बरला रक्तदान शिबिर सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत मिल्लिया कॉलेज ऑडोटोरियम हॉल किल्ला मैदान येथे होईल, इक़बाल टीपू आज़ाद विषयावर निबंध स्पर्धा होणार यावर तीन विषय दिलेले आहे यापैकी एक लिहून निबंध समितिकडे जमा करायचे आहे, 11 नोव्हेम्बरला सकाळी 11 वाजता सरकारी दवाखान्यात व दुपारी 2 वाजता गरीब एरियामध्ये सूफ़ी लंगरखाना (गरीब गरजू लोकांना अन्नदान)करण्यात येणार आहे, 12 व 13 नोव्हेम्बरला सकाळी 11 वा. ते सायं. 5 वाजेपर्यंत आंध्र प्रदेश मधून एक टीम येणार ज्या मध्ये राष्ट्रपुरुषांच्या विषयी माहिती प्रदर्शनाद्वारे देणार आहे, 13 नोव्हेम्बरला सायं. 6 वाजता इक़बाल टीपू आज़ाद कांफ्रेंस म्हणजेच व्याख्यान ठेवलेले आहे यामध्ये आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी सोलापुरहुन प्रसिद्ध व्याख्याते मौलाना इब्राहिम कासमी साहेब, प्रसिद्ध इतिहासकार व टीपू सुलतान पुस्तकाचे लेखक सरफ़राज़ अहमद, व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. इरतेक़ाज़ अफ़ज़ल साहेब येणार आहे व शेवटी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल अशा भरगच्च कार्यक्रमाने महोत्सव साजरा होणार आहे विशेष म्हणजे हे महोत्सव दारू नशापाणी न करता डी जे मुक्त कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमा मागचा हेतू देशाच्या राष्ट्रपुरुषा बद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी समाजामध्ये बंधुभाव समता एकता राष्ट्रप्रेम वाढिस हाथभार लागावा व समाजामध्ये जागृति व्हावी हा हेतू आहे वरील सर्व कार्यक्रमानुसार समित्या बनवलेल्या आहे उर्दू मुशायरा-कवि सम्मलेन समिति गुलाम साकिब आणि मिर्ज़ा नदीम बेग, रक्तदान शिबिर खैसर बेग व अलीम नाना यांच्याकड़े लंगर अन्नदान अयाज़ इनामदार सलीम खान व नदीम मेंबर यांच्याकड़े आहे निबंध स्पर्धा मुशाहेद काज़ी मुसा सर यांच्या टीमकड़े आहे प्रदर्शन एग्जिबीशन सुफियान मणियार अयाज़ अखतर समीर सरकार व शेख समीर यांच्याकड़े आहे वायलेंयटिरची जबाबदारी आमेर मदनी अमरजान पठान व नवीद इनामदार यांच्याकड़े असेल कॉन्फ्रेंसची जबाबदारी इलियास इनामदार व कलीम काज़ी राहतील पाण्याच्या व्यवस्थेसाठी अतीख अहमद खान व फेरोज कण्डक्टर व पार्किंगला स्वयसेवक राहतील अशी माहिती शहीद टीपू सुलतान जयंती उत्सव समिती निमंत्रक व लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रसिद्वि माध्यमांना माहिती दिली आहे.

Sharing

Visitor Counter