पहिल्याच दिवशी १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान .... !रक्तदान हे श्रेष्ठदान

पहिल्याच दिवशी १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान .... !रक्तदान हे श्रेष्ठदान
Amarsinh Pandit Birthday
आर.बी.अट्टल महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे उदघाटन
गेवराई/प्रतिनिधी
कोरोना योद्धांना रक्त पुरवठा अपुरा पडू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून येथील आर.बी. अट्टल महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार *सतीश भाऊ चव्हाण* यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
२९ मे २०२० रोजी आर.बी. अट्टल महाविद्यालयात *माजी आ. अमरसिंह पंडित* यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मे२०२० दरम्यान तीन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन फिजिकल डिस्टन्स राखून, मास्क वापरून करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर व आ. सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बब्बूभाई बारूदवाले,दीपक आतकरे , जालिंदर पिसाळ,अॅड. आनंद सुतार .बाजार समितीचे सभापती जगन काळे पाटील, पं.स. माजी उपसभापती कुमार राव ढाकणे, न्यू हायस्कूलचे मु. अ. जगताप डी.एन. शारदा विद्यामंदिरचे मु. अ. राजेंद्र जगदाळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे, ,अमृत डावकर, रजिस्ट्रार बी.बी. पिंपळे, अधिक्षक भागवत गौंडी, संदीप मडके, दत्ताभाऊ दाभाडे, गोरखनाथ शिंदे, शाम रूकर , अक्षय पवार, संदीप मडके, दत्ताभाऊ पिसाळ, कृष्णकुमार केरूळकर, पत्रकार सखाराम शिंदे, भागवत जाधव, शेख जावेद, अमोल कापसे, सोमनाथ मोटे, सुशील टकले, वसीम फारूकी, शेख मन्सूर, पदाधिकारी,कार्यकर्ते, डॉक्टर्स उपस्थित होते. या शिबिरासाठी ३०० विद्यार्थी व नागरिक कार्यकर्ते यांनी नांव नोंदणी केली आहे.याच कार्यक्रमात पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरूपात पोलिस स्टाफसाठी एन 95 मास्क सुपूर्द करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी आर.बी. अट्टल कॉलेज, जय भवानी कॉलेज व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
