आमदार फंडातून बीड शहरातील विंधन विहीर व मोटार च्या कामात गैरव्यवहाराची चौकशी करावी- मुसद्दीक खान 

Beed

आमदार फंडातून बीड शहरातील विंधन विहीर व मोटार च्या कामात गैरव्यवहाराची चौकशी करावी- मुसद्दीक खान 

बीड/वार्ताहर 

शहरातील आमदार फंडातून बोर व विहीर मंजूर करण्यात आले असून प्रत्येक भागात याची मंजुरी देण्यात आली आहे परंतु यात गैरव्यवहार झाल्याचे निवेदन मुसद्दीक खान यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की बीड शहरातील अजिजपुरा या भागात मा . आमदार मेटे यांनी आपल्या फंडातुन एक विंधन विहीर व मोटार बसविण्याचे काम मंजुर करण्यात आले होते . या आजिजपुरा भागात यांची पहाणी ही झाली होती , पण आमदार मेटे यांचा पी.ए. तंबे व गुत्तेदार यांनी सदर मंजुर विंधन विहीर व मोटार हे कारंजा , राजुरी वेस जवळ , सिटी हॉटेल जवळ येथे विंधन विहीर व मोटार बसविण्यात आली आहे . बीड शहरातील अजिजपुरा भागात झालेली विंधन विहीर व मोटार बसविण्यात आले नाही व या अजिजपुरा भागातील मंजुर झालेल्या विहीर हे दुसऱ्या भागात म्हणजे कारंजा , राजुरी वेस , सिटी हॉटेल जवळ येथे ही इंधन विहीर व मोटार बसविण्यात आली आहे . असे बीड शहरात असे विंधन विहीर व मोटार बसविण्यात गैरव्यवहार झाले आहे . असे आमदार मेटे यांचा आमदार फंडात विंध्न विहीर कामात गैरव्यवहार झाले आहे . या गैरव्यवहार ची चौकशी करावी ही विनंती . आमदार मेटे हे दुसऱ्याचे भ्रष्टाचार उघडतात व त्यांच्यावर कार्यवाही करतात . आमदार मेटे नी बीड न . प . व इतर अधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत केलेले आहे पण स्वतःचा आमदार फंडात झालेल्या गैरव्यवहारात आ . मेटे काय करणार? व कोणावर कार्यवाही करणार ?. मा . जिल्हाधिकारी , बीड यांनी या आमदार मेटेंच्या शहारातील विंधन विहीरी प्रकरणात झालेला गैरव्यवहारं व भ्रष्टाचाराची चौकशी करावी व तो पर्यंत गुत्तेदाराचे बील देऊ नये अशी मागणी अजिजपुरा भागातील नागरीकांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.असे मुसद्दीक खान यांनी निवेदनात म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter