आता शहराला दररोज मिळणार 4 कोटी 75 लाख लिटर पाणी

आता शहराला दररोज मिळणार 4 कोटी 75 लाख लिटर पाणी
आऊटस्कड भागातील पाणी प्रश्न मिटणार
बीड/वार्ताहर
अमृत अटल योजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून काही दिवसांपूर्वी या पाईपलाईनची यशस्वी टेस्टिंग देखील घेण्यात आली होती. परंतु आज प्रत्यक्ष या पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नाळवंडी नाका परिसरात असणाऱ्या जलकुंभ येथे अमृत अटल योजनेचे 10 MLD (Million Liter Per Day) पाणी उपलब्ध होणार आहे. सदरील पाणी जलकुंभात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी सहकाऱ्यांसमवेत भेट देत युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी पाहणी केली व आढावा घेतला.
अमृत अटल योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी माजी मंत्री आदरणीय जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषणजी क्षीरसागर यांचा सतत पाठपुरावा होता. या योजनेकडे मी स्वतः जाणीवपूर्वक जातीने लक्ष घालून होतो. शहरवासियांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ कसा मिळेल व पाण्याचे अंतर कसे कमी करता येईतो यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो व आहे असे भैय्यासाहेबांनी सांगितले.
अमृत अटल योजनेअंतर्गत बीड शहराला एकूण 25 MLD पैकी 10 MLD पाणी पुरवठा शहराला केला जाणार आहे. उर्वरित 15 MLD महावितरणमुळे प्रलंबित आहे. ते सुद्धा लवकरच येईल. अगोदरचे 32 व आताचे 10 मिळून एकूण 42 MLD म्हणजेच 4 कोटी 75 लाख लिटर पाणी शहरवासीयांना आता मिळणार असून यामुळे हद्दवाढ झालेल्या व नवीन समाविष्ट झालेल्या भागात पाणी टंचाई, पाण्याची अनियमितता या पाण्यामुळे मिटणार आहे.
उर्वरीत राहिलेल्या टाक्यांचे काम देखील लवकर पूर्ण होणार असून यामुळे शहरवासियांना कमी दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा होणार आहे.
याप्रसंगी समवेत माजी जि.प.सदस्य राजेंद्र राऊत, गटनेते सादेक जमा, नगरसेवक फारुख पटेल, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ, प्रेम चांदणे, राणा चौव्हान, भैय्या मोरे, प्रभाकर पोपळे, गणेश तांदळे, रंजित बनसोडे, शुभम धुत, मुन्ना इनामदार, माजी नगरसेवक अमोल पौळ, आरेफ खान, जिलानी बागवान,सौ.संगीताताई वाघमारे, विकास यादव, बंडू निसर्गध, ईश्वर धनवे, असरार शेख, नबील जमा, अमर विद्यागर, इकबाल भाऊ, ऋषभ वाघमारे, फामजी पारीख, राहुल शिंदे, विक्रम चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, न.प.कर्मचारी उपस्थित होते.
