सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन क्षिरसागर मुक्त बीड करावे- खालेक पेंटर

Beed

सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन क्षिरसागर मुक्त बीड करावे- खालेक पेंटर 

बीड/वार्ताहर

बीड चे विरोधी पक्ष विभागलेले असल्यामुळे 27% घराणेशाहीची तिसरी पिढी 73% जनतेवर राज करीत आहे. यामुळे सत्तेच्या गुर्मीत बीडची जनता मूलभूत सुविधांपासून वंचित असून सामान्य नागरिकाचे हाल होत आहेत. शहराचे रस्ते नाल्या व स्वच्छतेचे प्रश्न गंभीर झाले आहे अस्वच्छतेमुळे रोगराई वाढलेली आहे या गंभीर प्रश्नाकडे सत्ताधारी पक्षाचे लक्ष नाही प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयाचे निधी नगरपरिषदेला येत आहेत पण हे कुठे खर्च होत आहे याचा ताळमेळ नाही सिमेंट रोड साठी आलेले पैसे निकृष्ट दर्जाचे डांबरी रोड झाल्याचे चौकशीत सिद्ध झालेले आहे भ्रष्टाचाराचा रात बरबटलेली नगरपरिषद वर सातशे कोटीहून अधिक कर्ज झालेले आहे येणाऱ्या काळात नगरपरिषद ही ग्रामपंचायत होऊ नये म्हणून बीड चे सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्यास राजकीय गणित बदलू शकते आणि हे राजकीय गणित यासाठी बदलणे गरजेचे आहे की सध्या बीडचे सत्तेचे कारभार इतके बोखाडलेले आहे की दिवसाढवळ्या जिल्हाधिकारी कार्यालयात गोळ्या झाडून दहशतीचे वातावरण निर्माण होत घराणेशाहीचे जमीन वाद मात्र कार्यकर्ता जखमी होत आहे सत्ताधार्यांने वक्त बोर्डावर आपले बगलबच्च्या ना बसून वक्फ मालमत्ता बेकायदेशीर 99 वर्षाच्या करारावर देऊन मस्जिद दुर्गेच्या मालमत्तेचा नुकसान केलेला आहे एवढेच नाही नसून दर्गा हजरत शहा अबूबकर र.ह. साहेब च्या कायम सेवा इनामी जमीन तरफ खोड 46 एकर जमीन पैकी बरीचशी मौल्यवान जालना रोड वरील जमीन सत्ताधारी ने आपल्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर बेकायदेशीर 99 वर्षाच्या करारावर घेऊन जमीन हडपून बसलेले आहे ह्यासाठी बीडची सत्तापरिवर्तन होणे गरजेचे आहे म्हणून सर्व राजकीय पक्षाने एकत्रित येऊन क्षिरसागर मुक्त बीड करणे ही काळाची गरज आहे सध्या बीड नगरपरिषदेची निवडणूक समोर आल्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन क्षिरसागर मुक्त शहर विकास आघाडी स्थापन करून शहराला स्वच्छ प्रशासन नियमित पाणी स्वच्छ शहर हे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे असे आवाहन शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक खालेक पेंटर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Sharing

Visitor Counter