रमजान ईदची खरेदी करणार्या लोकांना गरीबांची हाक !

रमजान ईदची खरेदी करणार्या लोकांना गरीबांची हाक !
बीड/सय्यद अशफाक
(बीड प्रसार न्युज)
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य शासनाने व महाराष्ट्र शासनाने चे काटेकोरपणे नियम आपल्याला लावलेले आहेत ते अगदी चांगले व लोकहितासाठी आहेत परंतु आज या ठिकाणी रामजान ईदच्या सणासुदीला खरेदी करण्यासाठी महिलांची जास्त गर्दी वाढताना दिसत आहे.
खरेदीसाठी महिलांची संख्या जास्त प्रमाणात आज सुभाष रोड, धोंडिपुरा,बशीर गंज अशा वेगवेगळ्या भागात पाहण्यास मिळाली परंतु सणाची खरेदी करणे हेही चांगलीच गोष्ट आहे कारण वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि १ महिन्याचे पवित्र उपवास ठेवून सगळया मुस्लिम बांधवांना हा सण साजरा करण्यासाठी खुप अपेक्षा लागलेली असते.
परंतु तुम्ही त्या लोकांचा विचार केला का जे आज एका वेळेच्या जेवणासाठी परेशान आहे गलोगल्लीत बुकेने तडफडत फिरत आहेत.त्यांना जेवणासाठी अन्नधान्य नाही,त्यांचे मुलं बाळ कसे राहत असतील ? एक चारोळी सांगतो आजच्या या पार्श्वभूमीवर वर "देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही,सांग कुठे शोधु अन्न कळेनाच काही" अशी बिकट परिस्थिती आज गरीब लोकांची दिसत आहे.
ईदसाठी नवीन कपडे खरेदी केल्यावरच ईद होते का?
जर आपण ईदची खरेदी न करता आपला सण साजरा केला तर सण साजरा होणार नाही का? जर आपण आपल्या खरेदीचे पैसे खरेदी न करता गरिबाला अन्नधान्य वाटप केले तर चालणार नाही का?ईदच्या सामान गरिब लोकांना दिला तर त्यांची ईद साजरी होणार नाही का?
माहणून माझी संपूर्ण बीड जल्ह्यातील मुस्लिम बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण शक्यतो आपल्या घरच्या महिलांना घराबाहेर जाण्यासाठी थांबवावे. "घरी राहु,सुरक्षित राहू" असे आपण निर्धार करू.
