दुधाळ व मुख्याधिकारी गुट्टे यांना तात्काळ निलंबित करा- मोहम्मद खमरूल इमानखान

दुधाळ व मुख्याधिकारी गुट्टे यांना तात्काळ निलंबित करा- मोहम्मद खमरूल इमानखान
बीड/प्रतिनिधी
बिंदुसरा व माजलगाव धरणात पाणीसाठा उपलब्ध असताना देखील शहरात पाणीपुरवठा हलगर्जीपणा करणार्या दुधाळ तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता बाबत दुर्लक्ष करणारे मुख्याधिकारी गुट्टे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या जागी योग्य अधिकारी नियुक्त करा.
सध्या उन्हाळा सुरू असून नागरिकांना पाण्याची मोठी आवश्यकता असते व त्यातच करोना विषाणूचे रोकथानासाठी लॉकडाउन करण्यात आले असल्याने लोक घरीच असल्यामुळे पाण्याचा वापर जास्तीचा वाढलेला आहे सध्या बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरणात व माजलगाव धरणात मोठा पाणी साठा उपलब्ध आहे पाणी साठा वापरून दररोज पाणीपुरवठा केला तरी एक वर्षापेक्षा जास्त पाणीपुरवठा होऊ शकतो ? असे असतानाही बीड शहरात जाणून-बुजून पाणीपुरवठा उशिराने करण्यात येत आहे काही भागात ८ ते ९ दिवस तर काही भागात १२ ते १५ दिवसात पाणीपुरवठा करण्यात येत आहे यामुळे बीड शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे याबाबत वेळोवेळी पुरवठा नियंत्रण अधिकारी श्री.दुधाळ यांना तक्रार करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी कुठे लाईट नसून तर कुठे पाईपलाईन दुरुस्ती असल्याचे कारण दाखवण्यात येत आहे ही बाब आश्चर्यजनक की या ठिकाणी पाईप लाईन चोकअप असण्याचे कारण दाखवण्यात येत आहे त्या ठिकाणी पंधरा दिवसानंतर त्याच पाइपलाइनमधून पाणीपुरवठा कसा काय होतो हे काही समजेना?
बीड शहराला पाणी टंचाई भासली तरी यामुळे लोक पाण्यासाठी रस्त्यावर येऊ शकत नाही त्यामुळे लोकांच्या होऊन त्याचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पाणीपुरवठा नियंत्रण अधिकारी श्री.दुधाळे यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्या जागी योग्य अधिकारी नियुक्त करून बीड शहराला ३ दिवस म्हणजेच आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा करण्यात यावा सध्या कोरोना सोबतच इतर रोगांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे बीड नगर परिषदेच्या वतीने बीड शहरात स्वच्छता गरजेची आहे परंतु स्वच्छतेचा नाव दिसत नाही प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे इतर विषाणू पसरतो त्यामुळे इतर लोकांना रोगपसरण्याची शक्यता आहे तसेच प्रत्येक भागात काम होत नाही व कीटकनाशक फवारणी सुद्धा होत नाही साहेबांनी आमच्या बोलण्यावर शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता बाबत बीड नगर परिषद लगर्जीपणा चे पूर्ण जबाबदार
मुख्याधिकारी गुठ्ठे असून यांचा बीड नगर परिषदेवर कसल्याही प्रकारचे नियंत्रण दिसून येत नाही ते फक्त लाॅकडाउनच्या नावाखाली आरडाओरड करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे कार्य करीत आहेत सध्याची परिस्थिती बघून मे.साहेबांनी योग्य मुख्याधिकारी नगर परिषदेवर नियुक्त करणे गरजेचे आहे कारण मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता होणे गरजेचे आहे म्हणून साहेबांनी स्वच्छता व पाणीपुरवठा बाबत हलगर्जीपणा करणार्या मुख्याधिकारी व पाणीपुरवठा नियंत्रण अधिकारी श्री.दुधाडे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या जागी योग्य अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावे बीड शहराला आठवड्यातून दोनदा पाणी पुरवावे ठरलेल्या नियोजनानुसार शहराची स्वच्छता करून नागरिकांचे आरोग्य यांना संरक्षण द्यावे अशी मागणी मोहम्मद खमरूल इमानखान जफर खान नाज यांनी केली.
