मराठा समाजाचा मराठा नेत्यांनी विश्वासघात केला!- आसाराम गायकवाड

मराठा समाजाचा मराठा नेत्यांनी विश्वासघात केला!- आसाराम गायकवाड
बीड/वार्ताहर
महाराष्ट्रातसर्वाधिक लोकसंख्या मराठा समाजाची असल्यामुळे सर्वात मोठे नेतेही मराठा समाजाचे, सर्वात मोठे आमदार मराठा समाजाचे आहेत. ते कोणत्याही सरकार विरोधात बहुतांश नेते सभागृहात बसत होते हे समाजाने हे लक्षात ठेवने गरजेचे आहे. मग जनतेचे गुलाम पार्टीचे अशीच स्थिती झाल्यासारखी वाटते. सर्व मोठमोठे कारखानेे, शाळा महाविद्यालयसह विविध संस्था या थोड्याच लोकांच्या ताब्यात असुन हजारो एकर शेती असणारे समाजाच्या जीवावर मोठे झाले आहेत. समाजातील शेकडो एकर जमीनदार भूमिहीन करन्याचे महापाप केले आहे. हे पाप कुठे फेडणार हाच प्रश्न बुजुर्ग मंडळी बोलत आहेत. राज्यात संस्था, उदोग, बॅंका आदी लिपिक यंत्रनामार्फत फक्त समाज सार्वजनिक सामुहीक सुधारणा करण्या अगोदर आपली सुधारणा करण्यात आजही गुंतलेले आहेत. निवडणुका तोंडावर आल्या की समाज सोयरे, पाव्हने- रावळे, कुणाचे नाते- गोते कोठे आहेत यांच्या बाता करुन निवडणूका जिंकून सत्ता मिळतात, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतात.
विधानसभेत किती दिवस सभागृह तहकूब केले आहे, किती वेळा गदारोळ केला, फक्त स्वताहाची पब्लिसीटी करण्याचा धंदा केला आहे का? असा प्रश्न समाजातील लोक करत आहेत. काही छोट्या समाजातील आमदार मंत्री असताना समाजाच्या पिढ्या न पिढ्या नाव राहील अशा काही लोकांचे नाव देवसमान समाजात घेतात यात शंका नाही. हे मराठा समाजातील अनेक नेताना आदर्श घेण्यासारखे आहे कितीही गंभीर परिस्थिती मधून शिक्षन घेतले तरीही आरक्षण आडवे असल्यामुळे अनेकानी जिवन संपवले.
शिक्षणा बाबत सर्व सवलती नोकरी साठी सर्व विभागातील सर्व सवलती मोठ्या प्रमाणावर शेतकरी मराठा समाजातील असुन शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून सगळे आमदार सभागृहात बाहेर बसतात. यापुढे समाजाच्या विकासाठी विविध प्रश्न सोडविण्यासाठी समाजाचे राजकारण थांबवा. नेत्याची गुलाम बनलेले समाजाच्या हितासाठी मुक मोर्चे सर्वानी पाहीले आता सर्व मराठा समाजातील लोक प्रतिनिधी यांच्या कडे निवेदन देऊन यांचे कार्यालयासमोर जोपर्यंत सगळे सरकारला मराठा समाजाला सर्व सुविधा भाग पडणार नाहीत तो पर्यंत आंदोलन करू यात शंका नाही. सर्व समाज बांधवांनी यावर चिंतन करुन पाऊले उचलली पाहिजेत.
