जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने लाजा सोडल्या , उपचार घेणाऱ्या महिलांच्या उशाशी 20 घंटे मृतदेह !

जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने लाजा सोडल्या , उपचार घेणाऱ्या महिलांच्या उशाशी 20 घंटे मृतदेह !
नशीब घाबरून कोणी मेला नाही!
मुख्यमंत्री , प्रधान सचिव , विभागीय आयुक्तांना तक्रार -- डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर
बीड ( रिपोर्टर- गोरख मोरे )
बीड जिल्हा रुग्णालयातील व स्वच्छता , अनागोंदी कारभार , रेमडीसीवीर इंजेक्शन काळाबाजार , रुग्णांची सुरक्षा ऐरणीवर , यासह रुग्णांच्या अंगावरील सोने काढून घेणे आदि प्रकार घडत असताना आज दिनांक 30 एप्रिल शुक्रवार रोजी सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांनी जिल्हा प्रशासनाचे वाभाडे काढत बीड शहरातील नर्सिंग होम कोवीड सेंटरमधील वार्ड क्रमांक ए -8 मध्ये 20 तासापासून त्या ठिकाणी असून त्यांच्या पायथ्याशी त्याच ठिकाणी दोन महिला उपचार घेत आहेत , उशाशी प्रीत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी काल रात्री पासून काहीही खाल्ले नाही , तसेच प्रेत इतरत्र हलवण्यात यावे म्हणून नातेवाईकांनी 5--6 वेळा सांगून सुद्धा काहीही फरक पडलेला नाही .
मुख्यमंत्री , प्रधान सचिव , विभागीय आयुक्तांना तक्रार -- डॉक्टर गणेश ढवळे
बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडीसीवीर इंजेक्शन , वॉर्ड बोय भरती गैरव्यवहार तसेच इतरही गैरप्रकार रोजच सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे सह इतर कार्यकर्ते जिल्हा प्रशासनाचा अनागोंदी कारभार निदर्शनास आणून देत असताना सुद्धा जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काहीही परिणाम अथवा सुधारणा होताना दिसून येत नाही , वरील प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री , प्रधान सचिव , विभागीय आयुक्त यांना तक्रार केली आहे .
