महारटाकळी चेकपोस्टवर जीवघेणा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण

Beed

महारटाकळी चेकपोस्टवर जीवघेणा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण

गेवराई/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील गेवराई मधील महारटाकळी चेकपोस्टवर जीवघेणा प्रकार,भरघाव वेगात असणाऱ्या कंटनेर चालकाने बीड नगर सिमेवर असणाऱ्या महारटाकळी चेकपोस्टवरील बॅरिकेड्स उडविले पोलीस ,महसूल ,शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड नगर सिमेवर असणाऱ्या चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीतील महारटाकळी चेकपोस्टवर अतिशय भयानक प्रकार समोर आलेला आहे . संगमनेर कडुन येणारी गाडी नं एम. एच 17 ए जी 2351 ही गाडी महारटाकळी चेक पोस्टवर आली असता अचानक चेक पोस्टवरील बॅरिकेड्स तोडुन तैनात कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार केलेला आहे सदरील सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे .

Sharing

Visitor Counter