सर्वे नंबर 362/ 4 मधील शासकीय सिमेंट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी धारूर तहसील समोर उपोषण सुरू

सर्वे नंबर 362/ 4 मधील शासकीय सिमेंट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी धारूर तहसील समोर उपोषण सुरू
किल्लेधारूर/प्रतिनिधि
धारूर येथील सर्वे नंबर 362/4 मध्ये शासकीय सिमेंट रस्त्यावर पत्र्याचा डबा टाकून अतिक्रमण केले आहे मंडळाधिकारी धारूर व अतिक्रमण धारकाची बाजूला असलेली तीन मजली इमारत त्या खरेदी खतांमध्ये उत्तरेस सतरा फुटाचा रस्ता आहे असा उल्लेख केलेला आहे असे असताना सुद्धा सदरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे परंतु तहसीलदार धारूर यांनी अतिक्रमण धारकास 9 जुलै 2020 पर्यंत सदगीर अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती परंतु त्या नोटीसला केराची टोपली दाखवून सदरील अतिक्रमण काढले नसल्यामुळे आज दिनांक 10 सात 2020 रोजी अमरण उपोषणास तहसील कार्यालय धारूर येथे इंजिनीयर सादिक इनामदार यांनी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सदरील अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे सदरील अतिक्रमण संदर्भात महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी हे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासंदर्भात पत्र दिले आहे जिल्हा वक्फ अधिकारी बीड यांनीही सदरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिले आहे प्रशासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेऊन बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा अमरण उपोषण हे सुरूच राहणार आहे असे इंजिनीयर सादिक इनामदार यांनी म्हटले आहे








