पिक विमा व खताचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार ,पालकमंत्री व कृषिमंत्री यांचे आश्वासन-आ. बाळासाहेब आजबे

Ashti

पिक विमा व खताचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार ,पालकमंत्री व कृषिमंत्री यांचे आश्वासन-आ. बाळासाहेब आजबे

आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदारसंघात चांगला पाऊस झाल्याने वेळेवर पेरणी झाली आहे परंतु कोरणा-या महामारी आजारा मुळे सर्व क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण झाले आहेत कृषी क्षेत्रामध्ये ही बी-बियाणे खते याबाबत शेतकऱ्यांना काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत परंतु या अडचणी दूर करण्यासाठी आपण गेल्या काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री ना. धनंजय मुंढे साहेब व राज्याचे कृषिमंत्री माननीय दादा भुसे साहेब त्यांच्याकडे मुबलक खते मिळावीत, खरीप पिक विमा ,कृषी अनुदान व प्रलंबित फळबाग विमा संदर्भात पत्र देऊन वेळोवेळी मागणी केलेली आहे यावर मंत्रीमहोदयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात युरिया व इतर खतांचा तुटवडा जाणवत आहे येत्या चार ते पाच दिवसात सर्व खते उपलब्ध होतील याबाबत आपण कृषिमंत्री व कृषी आयुक्त यांच्याशीही चर्चा केली आहे तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रयत्नाने दोन दिवसात पिक विमा कंपनीचा ही प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही .अनेक शेतकऱ्यांचे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेततळे ,कांदाचाळ ,पॉलिहाऊस सामूहिक शेततळे अनुदानाबाबत ही कृषिमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे चार ते पाच दिवसात पिक विमा व युरिया खत उपलब्ध होईल एकही शेतकरी पीक विमा व खतापासून वंचित राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये असे आवाहनही शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे

Sharing

Visitor Counter