पद्मगंगा फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार जावेद पठाण यांना जाहीर

Ashti

पद्मगंगा फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार जावेद पठाण यांना जाहीर

आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

कोरोना विषाणू संक्रमण प्रादुर्भावाच्या काळामध्ये ही जनतेला समाजात घडणाऱ्या घटनांची माहिती देण्याचे प्रभावी कार्य केले या उत्कृष्ट कार्याची दखल अहमदनगर येथील पद्मगंगा फाउंडेशन भिंगार अहमदनगर यांनी घेऊन पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जावेद पठाण यांना जाहीर झाला आहे.

स्व. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पद्मगंगा साहित्य पुरस्कार आरोग्य, शिक्षण, कला. साहित्य आणि संस्कृती 2020 दरवर्षी नऊ जुलै रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रदान केले जातात. यामध्ये आष्टी जिल्हा बीड मधील दैनिक युवा सोबती चे पत्रकार जावेद पठाण यांना पत्रकारिता, लोकसाहित्य प्रा. डॉ.राजाराम तुकाराम सोनटक्के यांना शरद व्यवहारे व्यक्ती आणि वांङमय , कादंबरी ॲसं ज्ञानेश्वर प्रकाश जाधववर, कविता माती शाबूत राहावी म्हणून- वीरभद्र मिरेवाड, समीक्षा बाबासाहेब मुसळे व्यक्ती व वांग्मय- प्रा. डॉ. सुरवसे सोपान माणिकराव, संशोधन प्रा. डॉ. रमेश जयवंत खिळदकर, डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास सामाजिक - सौ तोडमल संगीता याप्रमाणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध क्षेत्रांमधील या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वाडकर धो.स., सचिव डॉ. आयतलवाड ज्ञानेश धो. यांनी जाहीर केले आहे.

Sharing

Visitor Counter