बिबट्याचा बंदोबस्त करावा नसता आंदोलन छेडणार - रवींद्र (काका) ढोबळे

बिबट्याचा बंदोबस्त करावा नसता आंदोलन छेडणार - रवींद्र (काका) ढोबळे
आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज
तालुक्यातील शिरापूर येथे मागील सहा महिन्यांपासून बिबट्या आपल्या दोन बछड्यासोबत फिरत असून यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाला अनेक वेळा माहिती देऊन तसेच निवेदने दिली तरीही अद्याप पर्यंत काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सदरील बिबट्याचा बंदोबस्त करावा नसता काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा रवींद्र (काका) ढोबळे यांनी आष्टीचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील शिरापूर, चिंचोली, टाकळी अमिया, मेहकरी, पुंडी, पिंपळगाव दाणी या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून एक मादी बिबट्या आपल्या दोन बछड्याना घेईन फिरत आहे. सदरील बिबट्याला या परिसरातील अनेक शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच शिरापूर - मेहकरी रस्त्यावर अनेकांनी पाहिले आहे. हा बिबट्या सायंकाळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्याच्या पाठीमागे धावत आहे. त्याने अनेक जंगली जनावरे, कुत्रे, मांजरांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी अनेकवेळा वन विभागाला माहिती दिली. परंतु अद्यापही काही कारवाई करण्यात आली नाही. या बिबट्याचा बंदोबस्त करावा नसता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आष्टी मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र (काका) ढोबळे यांनी आष्टीचे तहसीलदार वैभव महेंद्रकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.








