संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थांना घरपोच लाभ मिळेल - प्रा.ईश्वर मुंडे,आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली केले नियोजन

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थांना घरपोच लाभ मिळेल - प्रा.ईश्वर मुंडे,आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली केले नियोजन
किल्लेधारूर/प्रतिनिधी
बहू चर्चीत व खूप दिवसापासून रखडलेली संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना छानणी समितीची बैठक आ.प्रकाशदादा सोळंके,उपविभागीय अधिकारी, माजलगाव व तहसिलदार,धारुर, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पुढाकाराने संपन्न झालेली आहे.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ४३५ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी ४२४ अर्ज मंजूर झाले असून ११ नामंजूर झाले आहेत. श्रावणबाळ योजनेअंतर्गत २२६४ अर्ज प्राप्त झालेले होते. त्या पैकी १८३३ अर्ज मंजूर झाले असून ४३१ नामंजूर झाले आहेत. नामंजूर झालेल्या अर्जदारांना ना मंजूरीचे कारण कळविण्यात येणार आहे.
आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पात्र लाभार्थांना त्यांचे योजना लाभ मंजूरी आदेश दोन ते तीन दिवसात गावनिहाय घरपोच देण्यात येणार आहेत.
तरी योजना मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी लाभार्थांची फसवणूक, आर्थिक लुट करत असेल तर त्या पासून लाभार्थ्यांनी सावध राहवे.
असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धारूर तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले आहे.
