गांधी नगर भागात रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे लोकांचा आरोग्य धोक्यात!
Beed

गांधी नगर भागात रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे लोकांचा आरोग्य धोक्यात!
बीड/मन्सूर खान
तेलगाव नाका गांधीनगर भागातील नुर काॅलनी जवळ शिवनेरी रोड मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झालेली असुन या रस्त्यावर मोठमोठ्या खड्डे झालेले आहे व पावसाचा या खड्यात पाणी जमा होत असल्यामुळे नागरीकांना जाण्या-येण्यासाठी खुप त्रास होत आहे.
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज कोरोना सारख्या आपत्तीला लढण्यासाठी प्रशासन कठोर पर्यंत करत आहे जागोजागी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु या ठिकाणी पावसाच्या थांबलेल्या पाण्याणे चिखल होत व सांड पाणी देखील आहे व अशा अवस्थेतुनच या भागातील नागरीकांना पिण्याचा पाणी येत असल्याने नागरीकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








