किल्ले धारूर शहरात सोशलडिस्टन ,मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई!

किल्ले धारूर शहरात सोशलडिस्टन,मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई!
पोलिस व न. प. कर्मचाऱ्यांनी वसुल केला २३ हजारांचा दंड!
किल्लेधारूर/प्रतिनिधी
धारूर नगरपालिका कर्मचारी व पोलीस प्रशासनाकडून धारूर शहरांमध्ये मोटरसायकल व वाहणावर व मोकाट फिरणाऱ्या किंवा तोंडाला मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून आज एकूण 52 मोटारसायकल वर कारवाई करण्यात आली व 23000रू दंड वसूल केला असून यामुळे शहरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे
न.प.मुख्याधिकारी नितीन बागूल व पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या आदेशानुसार शहरांमध्ये तोंडाला मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली असून आज तेवीस हजार रुपये दंड नगर पालिका व पोलीस कर्मचार्यांकडून कारवाई करण्यात अली यावेळी पोलिस निरीक्षक सुरेखा धस, पो.कॉ. खमर पाशा, पो.काॅ वखरे,मिसाळ, सचिनडावकर संदीप नलावडे माणिक गायसमुदे माणिक लोखंडे फुने मॅडम पूजा जयभाय, बजरंग शिनगारे अरुण वाघमारे चंद्रकांत फुके विकास समुद्रे वैजनाथ चोपडे माणिक लोखंडे कर्मचारी आदीनी हा दंड वसूल केला व नगरपालिका कर्मचारी मार्फत मास्क न वापरणारऱ्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली








