बेकायदेशीर अतीक्रमण काढण्याबाबतअतिक्रमण धारकास बजावली तहसीलदार धारूर यांनी नोटीस

धारुर शहरातील तेलगाव रोड लगत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शेजारी चे बेकायदेशीर अतीक्रमण काढण्याबाबतअतिक्रमण धारकास बजावली तहसीलदार धारूर यांनी नोटीस
किल्लेधारूर/प्रतिनिधि
शहरातील तेलगाव रोड लगत इंडिया बँकेच्या शेजारी बेकायदेशीर सिमेंट रस्त्यावर अतिक्रमण केले आहे ते बेकायदेशीर असून सर्वे नंबर 362/4 मधिल रहदारीच्या रस्त्यावर पत्राच्या डबा टाकला हे अतिक्रमण सरकारी सीमेंट रहदारीच्या रस्त्यावर आहे सदरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनीसुद्धा पत्र देऊन सदर अतिक्रमण काढून अतिक्रमण हटवण्याबाबत अहवाल सादर करण्याचे पत्रात म्हटले आहे तसेच जिल्हावक्फ अधिकारी बीड यांनी सदरील बेकायदेशीर व विनापरवाना टाकलेला पत्र्याचा डबा तात्काळ काढण्यासाठी तहसीलदार किल्ले धारूर यांना पत्र दिले आहे अतिक्रमण धारकाने सिमेंट रस्त्यावरील पत्र्याचा डबा रहदारीसाठी अडचण निर्माण करत असल्याने याबाबत तहसिलदार यांनी संबंधितांना सात दिवसात बेकायदेशीर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देवून अतिक्रण काढून घेण्यास सांगितले आहे. या बाबत मंडळ अधिकारी धारूर यांनी स्थळपहाणी केलेल्या संदर्भ क्रमांक 02 चा पाहणी पंचनाम्यात नमुद केले आहे त्या अनुषगाने संदर्भ क्र .2 व 3 अन्वये सर्व नंबर 362 /4 मध्ये अतिक्रमण धारक ऋषिकेश सुभाष दुबे यांनी रहदारीच्या रस्त्यावर पत्राच्या डबा टाकला असून त्याने रहदारीस अडचण निर्माण होत आहे तसेच सदरील अतिक्रमण धारकाची त्या पत्र्याच्या डब्या शेजारी तीन मजली इमारत असून त्याच्या खरेदीखत वर दक्षिणेस सतरा फुटाचा रस्ता आहे अशी नोंद आहे जर ते अतिक्रमण काढले नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या ठिकानी अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात यावे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी शासनाने कठोर पाऊल ऊचलवावे यासाठी ते अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजिनीयर सादिक इनामदार यांनी केली आहे








