बीड शहर कडकडीत बंद,बीड पोलिस प्रशासन पुन्हा सज्ज तयार!

Beed

बीड शहर कडकडीत बंद,बीड पोलिस प्रशासन पुन्हा सज्ज तयार!

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे वाढते रुग्ण जास्तच वाढत असल्यामुळे व कोरोना महामारीचा जास्त थैमान
वाढत असल्यामुळे काल रात्री १२ वाजल्यापासून जिल्हा अधिकारी यांनी ९ जुलैपर्यंत पर्यंत बीड शहर कडकडीत बंद चे आदेश दिले.

आज शहर सकाळपासून कडकडीत बंद होते. स्वत:हून नागरीक आपआपल्या घरात बसले असल्याचे दिसून आले. बुधवारी आढळलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेला होता तसेच अन्य ठिकाणीही फिरला आहे. शहरात सामूहिक संसर्ग वाढू नये यासाठी रात्री १२ वाजल्यापासून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सात दिवसांसाठी शहर लॉकडाऊन केले. पुढील ९ जुलैपर्यंत शहरात संचारबंदी राहणार आहे. फिरते दुध विक्रेते, परवानाधारक फळभाजी विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. शहरातील नागरीकांनीही स्वत:हून आपआपल्या घरात बसणे पसंत केले. शहरात आज कडेकोट संचारबंदी असल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनानेही ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे.व फिरते पथक देखील आपला कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावत असल्याचे सपष्ट दिसुन आले.

Sharing

Visitor Counter