मास्क वाटप करून चि. देवांश ज्ञानेश्वर शिंदे याचा वाढदिवस!पत्रकार व नवक्रांती मित्र मंडळाच्या उपस्थित सम्पन्न

Dharur

मास्क वाटप करून चि. देवांश ज्ञानेश्वर शिंदे याचा वाढदिवस!पत्रकार व नवक्रांती मित्र मंडळाच्या उपस्थित सम्पन्न

किल्लेधारूर/प्रतिनिधि

बीड जिल्ह्यातील कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला जिल्ह्याचा कोरोना ग्राफ रोज नवं नवीन नगर,गावे गाठत आहे, त्यात बाजार,बँक,सार्वजनिक ठिकाने गर्दी ने गजबजू लागलेली आहे, लोकांनी सोशल डिस्टनसिंग न पाळता व तोंडावर मास्क न घालता वावरताना सर्रास दिसत आहे याची जाणीव ठेवून चि. देवांश ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आषाढि एकादशी चा मुहूर्त साधून नवक्रांती मित्र मंडळाच्या सहकार्याने किल्ले धारूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे विविध फिरती गाडे फळ भाज्या व्यवसायिक, शेतकरी, व्यापारी व किल्ले धारूर येथील नागरिक यांना मास्क वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपत आगळ्यावेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला
या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अनिल महाजन,युवा नेते गणेश सावंत, कायाकल्प सदस्य विजय शिनगारे,सकल मराठा सदस्य,अतुल भैय्या शिनगारे,नवक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष अमरजीत भैय्या तिवारी,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सचिव प्रवीण शेटे,कोषाध्यक्ष दिनेश कापसे,विश्वानन्द तोष्णीवाल सचिन बैरागी,सुभाष पवार,अश्विन गुळवे, निखिल पाथरकर,महेश कुंभार विशाल कोमटवार, सतीश कोमटवार व इतर उपस्थित होते

Sharing

Visitor Counter