धारूर तहसील कार्यालयातील कर्मचारी सर्वात बेशिस्त - आमदार प्रकाशदादा सोळंके

Dharur

धारूर तहसील कार्यालयातील कर्मचारी सर्वात बेशिस्त - आमदार प्रकाशदादा सोळंके

अस्वछतेतच आम सोळंके यांना करावे लागले धनादेशाचे वाटप माहिती देताना अधिकारी यांची बोबडी वळली

किल्लेधारूर/प्रतिनिधि

धारूर शहरातील तहसील प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची आमदार प्रकशदादा सोळंके यांनी चांगलीच झडती घेतली अधिकारी सर्व सामान्य जनतेची कामे करत नसल्याच्या तक्रारी झाल्या होत्या

तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी तर बेशिस्तीचे प्रदर्शन मांडले होते ज्या ठिकाणी आम प्रकाश दादा सोळंके धनादेश वितरित करणार होते त्या ठिकाणी अस्वच्छता पसरली होती रस्त्यात बाटल्या होत्या अधिकारी यांनी आमदार येणार आहेत माहीत असताना देखील स्वच्छता करण्यात आली नव्हती एरवी तर कसे असेल याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे

निराधार योजनेतील अधिकारी यांची बोबडी वळली .आमदार यांनी लाभार्थी यांची माहिती मागितली असता नायब तहसीलदार व संबधित प्रमुख अधिकारी याना माहिती देता आली नाही त्यामुळे आमदार याना चिडून म्हणावे लागले धारूर तहसील कार्यालयातील कर्मचारी हे सर्वात बेशिस्त आहेत नागरिकांनी तक्रारीचा पाढाच आज आमदार यांच्या समोर वाचला

नगरपरिषद सी ओ यांची देखील कान उघडणी आमदार महोदयांनी केली प्रत्येक कामात थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असताना देखील धारूर नगर परिषद करत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावर मुख्याधिकारी यांची चांगलीच कान उघडणी आमदार यांनी केली कुंडलिक पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे असेही सूचित केले

निराधार योजने साठी पैसे घेतले जात असल्याचे नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या यापुढे नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी माझ्या व्हॉट्स अॅप नंबर वर तक्रार करावी असे देखील आमदार मोहदयानी सांगितले

Sharing

Visitor Counter