गरीब माणसाचा आणि रूग्णाचा हाल बे हाल होत आहे एम्बुलेंस ची सुविधा असुन पण वेळेवर उपलब्ध होत नाही!

Beed

जिल्हा शल्य चिकित्सक बीड डाॅ.आशोक थोरात यांनी जिल्हा रूग्णालय कडे लक्ष देण्याची गरज!

आरोग्य अधिकारी व उपजिल्हा आरोग्य धिकारी यांचा बीड जिल्हा रुग्णालय कडे दुर्लक्ष का?

"गरीब माणसाचा आणि रूग्णाचा हाल बे हाल होत आहे एम्बुलेंस ची सुविधा असुन पण वेळेवर उपलब्ध होत नाही!"

बीड/प्रतिनिधी

जिल्हा अधिकारी साहेब कृपया करून बीड जिल्हा रुग्णालय कडे लक्ष द्यावे कारण या ठिकाणी रूग्णाच्या जीवाशी खेळताना लोक दिसत आहेत.

जिल्हा रुग्णालयमध्ये साजीया खुरेशी रा.मोमीनपुरा बीड ही महिला २९/०६/२०२० रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती. हि महिला गर्वधर असल्यामुळे या वर उपचार सुरू करण्यात आला पण अचानक रात्री ९ च्या सुमारास त्याचा B.P वाढल्यामुळे त्या महिलेला सुविधा नसल्याने अंबाजोगई येथे हलविण्यात आले.

त्या महिलेला खुपच त्रास होत असल्याने रात्री ९ च्या सुमारास १०८ या क्रमांकावर फोन करून अंबाजोगईला उपचाराला जाण्यासाठी फोन केला होता त्यानंतर पण एम्बोलेंस ११:३० च्या सुमारास आली या वेळेत रूग्णाचे हाल बेहाल झालेत.दोन तीन वेळेस फोन करून सुद्धा एम्बोलेंस वेळेवर आली नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकामध्ये आक्रोश पाहाण्यास भेटले.जर रूग्णाचा काही बरं वाईट मध्ये वाटेत झाला असता तर याचा जिम्मेदार कोण ?असा प्रश्न जमाव नागरीकात उपस्थित होत होता .

Sharing

Visitor Counter