सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करा. सुग्रीव लाखे
Beed

सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करा. सुग्रीव लाखे
बीड/प्रतिनिधी
सोयाबीन बोगस बियाणे उगवले नाही त्या शेताचे तात्काळ पंचनामे करा. अशी मागणी सुग्रीव लाखे पाटील यांनी केली आहे
खरीप हंगाम सन 2020 मध्ये सोयाबीनचे सदोष बियाणे विपरीत झाले आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उगवण न झालेल्या शेतामध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे मात्र. त्या शेताचे पंचनामे होणे गरजेचे आहे. मंडळ अधिकारी व तलाठी सज्जा यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या अशा शेताचे पंचनामे करावेत . व दोषींवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुसकान भरपाई मिळवुन द्यावी. अशी मागणी सुग्रीव लाखे पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.








