शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर मनसेचा दणका देऊ-वैभव काकडे
Beed

शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर मनसेचा दणका देऊ-वैभव काकडे
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी केवळ कागदपत्रांच्या नावाखाली शेतकर्यांची अडवणुक करत आहेत.शेतकऱ्याची कागदपत्रासाठी तारांबळ होत आहे तलाठी सेवा सोसायटीचे कर्मचारी बँकेचे मॅनेजर असे लोक शेतकऱ्यांना रांगेत उभा करून अवाजवी पैश्याची मागणी करून पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड योजनासाठी वेठीस धरत आहेत तेव्हा हा कारभार आठ दिवसात सुधारावा नसता जिल्ह्यातील बँक मॅनेजर व इतर कर्मचाऱ्यांना मनसे दणका देऊन वठणीवर आणू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष वैभव काकडे यांनी दिला आहे.








