किल्ले धारूर युथ क्लबने छत्रपती शाहू महाराज यांची केली जयंती साजरी

Dharur

किल्ले धारूर युथ क्लबने छत्रपती शाहू महाराज यांची केली जयंती साजरी

धारुर/प्रतिनिधि

समाज घडवणार्‍या अनेक थोर महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी समाजामध्ये साजरी करण्यात येते आज श्री छत्रपती शाहू महाराज यांची 146 वी जयंती किल्ले धारूर युथ क्लब च्या वतीने हुतात्मा काशिनाथ चिंचाळकर स्मारक या ठिकाणी साजरी करण्यात आली .यावेळी शाहू महाराजांच्या फोटोला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करण्यात आले .यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती सांगण्यात आली. त्यांनी केलेले कार्य यामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि स्त्री सन्मान तसेच गोरगरीब जनतेला स्वाभिमानाची वागणूक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण या सर्व गोष्टीवर त्यांनी विशेष कार्य केले, आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्यभर काम केले अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली यावेळी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी धनंजय भावठाणकर, सुरेश शिनगारे, अनिल तिवारी यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन धोत्रे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी किल्ले धारूर सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी किल्ले धारूर सदस्य सुरेश शिनगारे, अविनाश चिद्रवार , गौतम शेंडगे , अनिल तिवारी , विशाल सिंह दिख्खत , अमर रुद्रवार, धनंजय भावठणकर , श्रीराम सिकची ,पवन धोत्रे महेश गवळी हे उपस्थित होते तसेच यावेळी काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते यामध्ये रामदास गायकवाड, ज्ञानोबा गायकवाड , साहेबराव पिंगळे, नामदेव फावडे हे उपस्थित होते .

Sharing

Visitor Counter