एफ.एम.दुंगे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित!

एफ.एम.दुंगे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित
बीड/प्रतिनिधी
एफ.एम.दुंगे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित जगाच्या पाठीवर कोरोना या महामारीने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रातही त्याचे पडसाद दिसत आहेत जालना जिल्ह्यातील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे अशा या कठीण प्रसंग समयी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर एफ.एम. दुंगे यांनी साखर कामगार पोलीस प्रशासन पत्रकार यांना वेळोवेळी सैनिकाचे पुरवणे मास्कचा वापर करणे कामगारांच्या आरोग्याची काळजी करणे त्यांना रुमाल किंवा मास्क वापरणे बंधनकारक करणे कामावर येण्या जाण्यापूर्वी हात सॅनिटायझर ने स्वच्छ करणे गेटवर आवक-जावक रजिस्टर ठेवणे प्रत्येकाची नोंद घेणे कारखाना परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला मंगल कार्यालयाच्या इमारतीमध्ये होमकाॕरंटाईन करणे वेळोवेळी परिसर सॅनिटायझर करणे या कार्याची दखल घेऊन मानव अधिकार सेवा संघाने त्यांना कोरणा योद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर शेख, प्रदेश महासचिव पुष्कर सराफ, प्रदेश कार्याध्यक्ष कमलेश शेवाळे, प्रदेश संपर्कप्रमुख वजीर शेख, जालना जिल्हा अध्यक्ष तन्वीर बागवान, जिल्हा सचिव राधाकिसन आव्हाड, जिल्हा संपर्कप्रमुख रहीम तांबोळी, अंबड तालुका अध्यक्ष तारेख सय्यद, व सर्व जालना टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.








