शाहू महाराज जयंती निमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने हँनड्ड सॅनिटायझर डिस्पेंसरी यंत्रांचा लोकार्पण सोहळा

शाहू महाराज जयंती निमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने हँनड्ड सॅनिटायझर डिस्पेंसरी यंत्रांचा लोकार्पण सोहळा
धारूर/इरफान शेख
धारूर येथील राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमी वर सर्वाजिक ठिकाण बसस्थानक, जागृती मल्टी स्टेट व राजमुद्रा संपर्क कार्यालय या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष किशोर अप्पा पिंगळे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके यांच्या संकल्पनेतून हँनड्ड सॅनिटायझर डिस्पेंसरी यंत्रांचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला.
सद्या कोरोना या विषाणू ने जगात हाहाकार माजवला आहे या विषाणू पासून बचाव होण्यासाठी हाथ वेळोवळी धुणे गरजेचे आहे यासाठी सामाजिक कार्य समजून राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने नागरिकांसाठी यंत्राचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस मॅडम जागृती मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके, आंबेजोगाई येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे , धारूर आगार व्यवस्थापक शंकर स्वामी, शिवसेना तालुका अध्यक्ष नारायण कुरुंद, शहर अध्यक्ष दामोधर शिनगारे,मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन , नाथा ढगे, प्रकाश काळे, अतुल शिनगारे, सतीश पोतदार, रवी गायसमुद्रे ,बंडू सावंत ,सर्व संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी मराठवाडा संपर्क प्रमुख महेश आलाट,युवक जिल्हा अध्यक्ष बबलु सावंत,ता. अध्यक्ष ऊमेश पवार , नाथा चव्हाण, सुनील गैबी ,सचिन चिरके ,सचिन शिरसट, बबलू औताडे ,नितीन शिरसट, महेश गवळी ,ज्ञानेश्वर कदम ,विजय शिरसट , उमेश बोबडे यांच्यासह धारूर शहरातील नागरिक उपस्थित होते या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे








