पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन

पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन
बीड/प्रतिनिधी
पडळकर याने आदरणीय पवार साहेबा बद्दल जे वक्तव्य काढले त्याबद्दल पडळकर वर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस प्रज्ञाताई खोसरे यांनी केले
काल 24/4/2020 रोजी आदरणीय पवार साहेबां बद्दल खालच्या थराचे वक्तव्य काढले त्याचा जाहीर निषेध म्हणून बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी जोडे मारो आंदोलन करून कलेक्टर साहेबांना निवेदन दिले निवेदनामध्ये पडळकर विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे मुद्दाम नमूद केले आहे
ज्या पडवळराचे विधानसभेच्या वेळेला डिपॉझिट जप्त झाले अशा लायकी नसलेल्या माणसाने आदरणीय पवार साहेब बद्दल असे वक्तव्य काढावे हे खरंच लाजिरवाणे आहे आदरणीय पवार साहेबांची समाजसेवा आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही जातीभेद न पाळता समानतेचा मंत्र जोपासला पवार साहेबांचे बोट धरून आम्ही राजकारण शिकलो असे आपलेच माननीय पंतप्रधान यांचे वक्तव्य आहे याचे तरी भान राहू द्या आणि इथून पुढे बोलताना आपण काय बोलतो याचा थोडा विचार करावा नाहीतर गाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांशी आहे बांगड्या आणि चोळी घालून तुम्हाला कसं वाट लावायचं ते आम्हाला चांगलेच माहिती आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपप्रदेश अध्यक्ष निंबाळकर ताई,प्रदेश सरचिटणीस खोसरे ताई, शहराध्यक्ष घुमरे ताई ,राणीताई उपस्थित होत्या








