धारूर नगरपालिकेत जनविकास आघाडी उपनगराध्यक्षपद देण्याची मागणी

धारूर नगरपालिकेत जनविकास आघाडी उपनगराध्यक्षपद देण्याची मागणी
धारूर/प्रतिनिधी
धारूर नगरपालिकेत बिनशर्त पणे जनविकास आघाडी ही भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे शेवटचे एक वर्ष जनविकास आघाडी च्या नगरसेवकास उपनगराध्यक्षपदी द्यावे अशी मागणी जनविकास आघाडी च्या दोन्ही नगरसेवकांनी जनविकास आघाडीचे नेते मोहनराव जगताप व नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्याकडे केली आहे
धारूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे या नगरपालिकेत सुरुवातीपासून जनविकास आघाडी चे दोन नगरसेवक हे बिनशर्त पुणे भाजपसोबत काम करत आहेत यामध्ये राजश्री बाळासाहेब खामकर यांची उपनगराध्यक्षपदी शेवटच्या एक वर्षासाठी निवड करावी व जनविकास आघाडीलाही सत्तेत संधी द्यावी व न्याय द्यावा अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी जन विकास आघाडीचे नेते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्याकडे केली आहे व नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्याकडेही ही मागणी केली आहे ही मागणी तात्काळ मार्गी लावावी नसता आम्हास विचार करावा लागेल असाही इशारा जनविकास अघाडीचे अर्जूनराव गायकवाड व राजश्री खामकर या दोन नगरसेवकांनी दिला आहे








