सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला
Beed

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला
मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते . दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले








