कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन हा डिजिटली साजरा करण्यात आला आहे. करोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने 'सोशल मीडिया'तून झुम अॅप द्वारे व गुगल मिट द्वारे हा दिवस आष्टी येथील छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयात साजरा करण्यात आला यंदाच्या आंतराष्ट्रीय योग दिनासाठी 'योग घरी आणि योग कुटुंबासोबत' अशी संकल्पना मांडली होती 'सोशल मीडिया'तून प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आ.भीमराव धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत , प्राचार्य श्रीराम आरसुळ, प्रा. काळे पि आर, उपस्थित होते यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.तांबोळी आय.एम. यांनी योगासने चे प्रात्यक्षिक करून दाखविले








