गलवान घाटीतील शहीद जवानांना अभाविप कडुन श्रद्धांजली!

Dharur

गलवान घाटीतील शहीद जवानांना अभाविप कडुन श्रद्धांजली!

धारूर (प्रतिनिधी)

चीन सीमेवरील लडाख क्षेत्रातील गलवान घाटी मध्ये भारतीय जवान सीमेवर लढताना शहीद झाले या जवानांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किल्ले धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अभाविप प्रदेश मीडिया संयोजक गोविंद देशपांडे म्हणाले की , चीन सीमेवरील शाहिद जवानांच्या मृत्यूचा बदला भारत सरकारने घेतला पाहिजे परंतु अशा गंभीर परिस्थितीत देशातील जनतेने एकत्र येणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगीतले.
यावेळी नागेश गलांडे म्हणाले , हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारे आज चीन च्या विषयावर गप्प आहेत . पण हा नवीन भारत आहे चीन ला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे .

यावेळी कार्यकर्त्याकडून भारत माता की जय, वंदे मातरम , बायकॉट चायना , भारतीय सेना जिंदाबाद , अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला
यावेळी प्रदेश मिडिया संयोजक गोविंद देशपांडे, महेंद्र उजगरे, अक्षय शिंदे, नागेश गलांडे, शुभम निकते, ॠतुराज लांब, अक्षय तांदळे,ज्ञानेश्वर कोरडे ,प्रदीप पुजदेकर,कौशल महामुनी,धीरज काळे, आकाश माने,रमेश जाधव, प्रितम नांदेडकर, ज्ञानेश्वर साखरे आदी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sharing

Visitor Counter