शेतकऱ्यांनी कृषी दुकानातुन बियानाची खरेदी केली मात्र खरेदी केलेले बियाणे उगवलेच नाही

Dharur

शेतकऱ्यांनी कृषी दुकानातुन बियानाची खरेदी केली मात्र खरेदी केलेले बियाणे उगवलेच नाही

धारूर तालुक्यातील शेतकरी ही कंपनी विरूध्द तक्रार करणार

धारूर/प्रतिनिधी

बीड जिल्हयातील इतर तालुक्या पाठोपाठ आता धारूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात कृषी दुकानदारांकडुन सोयबीनचे बियाणे खरेदी केलेले १५दिवसा पासुन उगवलेच नाही हा प्रकार आता तालुक्यातील आंबेवडगाव येथील विठ्ठल वाघमोडे या शेतकऱ्याच्य शेतात घडला आहे या अगोदर शेतकऱ्यांने कृषी दुकानातुन बियाणाची खरेदी केली मात्र खरेदी केलेले बियाणे उगवले नाही.अशा तक्रारी माजलगाव,अंबाजोगाई,परळी, बीड या तालुक्यातून कृषी विभागाला प्राप्त झाल्या. तक्रारीची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड यांनी दखल घेतली याबाबत अधिक्षक कृषी अधिकारी निकम यांच्याशी चर्चा करून तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या त्या मुळे ज्या शेतकऱ्यांचे बीयाने उगवले नाही अश्या शेतकऱ्यांने सोयाबीन खरेदी केल्याची पक्की पावती व सातबारा,घेऊन तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल कराव्या असे आवाहन कृषी विभागाने केलेआहे याबाबत समन्धीत फसव्या कंपन्यावर काय कारवाई होते व शेतकऱ्याना झालेली नुकसान भरपाई भेटते का नाही याकडे शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे.

Sharing

Visitor Counter