मा.ना. महादेव जानकर यांनी दिली पूजा अशोक मोरे यांच्या आधुनिक शेळी पालन प्रकल्पास सदिच्छा भेट

मा.ना. महादेव जानकर यांनी दिली पूजा अशोक मोरे यांच्या आधुनिक शेळी पालन प्रकल्पास सदिच्छा भेट
गेवराई/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मिरगाव या ठिकाणी शुक्रवार रोजी माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंञी महादेव जानकर यांनी पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांचे वडील अशोक मोरे यांच्या आधुनिक शेळी पालन प्रकल्पास सदिच्छा भेट दिली त्यावेळी एका शेततळ्याचे उदघाटनही त्यांनी केले व तलवाडा सर्कल मधील काही शेतक-यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्याशी शेती,पशुपालन, मत्स्यव्यवसाय याविषयी चर्चा केली.अशोक मोरे यांच्या शेताकडे जाणा-या रस्त्यावर सध्या पडलेल्या पावसामुळे चीखल असल्याने आधुनिक शेळी पालन ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावर चिखल असल्याने व त्या ठिकाणी गाडी जात नसल्याने ते बाळू मोरे या शेतकऱ्याच्या छोट्या टॅक्टर मध्ये प्रवास करत त्या ठिकाणी पोहचले.
जानकर साहेब पुढे बोलताना म्हणाले कि शेतक-यांमध्ये काम मागण्याची नाही तर काम देण्याची दानत आहे.त्यासाठी शेतक-याने शेळीपालन, कुकुट पालन,फळ बागायती या सारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळून काॅर्पोरेट शेती केली पाहिजे.जवळ जवळ 2.30 तास शेतात फेरफटका मारून त्यांनी गोदा पट्यातील भौगोलिक परिस्थिती व त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला.गोदावरी काठावर जाऊन पाणी परिस्थितीचा आढावा घेण्याचा मोह ते आवरू शकले नाही यावेळी पं.स.सदस्य पुजा मोरे,अशोक मोरे, दै.सूर्योदयचे संपादक गंगाधर नाना काळकुटे,बोरगाव थडीचे सरपंच मींड,परमेश्वर वाघमोडे,अविनाश काकडे,बंडु टाकणे,अशोक हापटे, ठकाजी कोळेकर,भाऊसाहेब गोडबोले, सुदर्शन धुमक,सुरेश धुमक,अच्चुत मराठे,वचिष्ठ माखले,गणेश मोरे,बाळू मोरे पंचक्रोशीतील गावकरी व शेतकरी उपस्थित होते.








