आष्टी - पाटोदा- शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी माती परिक्षणाची सर्वउत्तम सोय- प्राचार्य श्रीराम आरसूळ

Ashti

कृषी महाविद्यालयात अद्यावत माती परीक्षण प्रयोग शाळा

आष्टी - पाटोदा- शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी माती परिक्षणाची सर्वउत्तम सोय- प्राचार्य श्रीराम आरसूळ

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आता माती परीक्षणासाठी अहमदनगर व बीड येथे जाण्याची आवश्यकता नाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाने व प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण करण्याची सोय आष्टी मध्ये उपलब्ध केलेली आहे आंनद चॅरिटेबल संस्था आष्टी संचलित श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे अद्यावत व आधुनिक मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्य माती परीक्षण प्रयोग शाळा सुरु केलेली आहे या माती परीक्षण प्रयोग शाळेस महाराष्ट शासन कृषी विभाग यांचे कडून मान्यता प्राप्त झालेली आहे तरी शेतकऱ्यांनी जमिनीच्या  उत्तम आरोग्यासाठी व पिकांच्या व फळ बागांच्या भरघोस उत्पादनासाठी शेतातील माती नमुन्याचे परीक्षण करावे व आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून आर्थिक उन्नती साधावी असे आह्व्हान प्राचार्य श्रीराम आरसूळ यांनी केले आहे. पुढे माहिती देतांना प्राचार्य श्रीराम आरसुळ म्हनाले की माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस 'मृदा आरोग्य पत्रिका' असे नाव आहे. पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे वापरास फार महत्त्व आहे. पिके ही पोषणाला आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे, हे पाहण्यासाठी म्हणजेच सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण करावे ,  यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय माती परीक्षण व पीक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळते.

Sharing

Visitor Counter