धारूर शहरातील संभाजी नगर मधील बी एस एन एल चे टॉवर बनले धोकादायक
Dharur

धारूर शहरातील संभाजी नगर मधील बी एस एन एल चे टॉवर बनले धोकादायक
धारूर/इरफान शेख
धारूर शहरातील संभाजीनगर भागातील बी एस एन एल चे टॉवर धोकादायक बनले आहे या टॉवर च्या पाकळ्या अँगल पडत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेवून जीवन जगावे लागत आहे येथील इमारत देखील जीर्ण झाली आहे
३५० फुट उंच असलेल्या या टॉवर सभोवती राहणाऱ्या नागरिक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसापूर्वी टॉवरचे एक वजनदार अँगल खाली पडले असे वारा अल्यानंतर आणेक अँगल पडत आहेत संपूर्ण टॉवर खिळखिळे झाले आहे याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कोणीही नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत
या टॉवर कडे केज बी एस एन एल ने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक बहुजन विकास मोर्चाचे तालुका अध्यक्ष महादेव नाईकवाडे, राजेश जाधव, उत्तम जाधव , बादलसिंग गोके यांच्यासह नागरिकांनी केली आहे
