ढगे कोचिंग क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड

ढगे कोचिंग क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड
धारुर/इरफान शेख
धारूर येथील शैक्षणिक कोचिंगच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ढगे कोचिंग क्लासेसची यशाची परंपरा २२ वर्षा पासुनची आजही कायम आहे या वर्षी क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय गढी या ठिकाणी निवड झाली आहे आतापर्यंत २२ वर्षात क्लासेसच्या ७२ विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयास झाली आहे
जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल आज १९ जून रोजी जाहीर झाला आहे त्यात ढगे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी कु श्रावणी कसपटे, चि अर्थव शिंदे, चि राहुल वाघमोडे यांची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय गढी याठिकाणी निवड झाली आहे त्यांना नाथा ढगे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
सी बी एस सी पट्रन चे बारावी पर्यंतचे शिक्षण अगदी मोफत या विद्यार्थ्यांना मिळणार आहे कठीण असणाऱ्या या परीक्षेत यश मिळवल्या बद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल महाजन, राजमुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश शेळके संतोष कसपटे रमाकांत शिंदे, वैजनाथ वाघमोडे इत्यादींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत








