राजकिशोर मोदींना विधान परिषदेवर संधी द्यावी:- भागवत गव्हाणे

Dharur

राजकिशोर मोदींना विधान परिषदेवर संधी द्यावी:- भागवत गव्हाणे

धारूर (प्रतिनिधी)

विद्यार्थिदशेपासून काँग्रेस पक्षाची विचारधारा जोपासून पक्षाचे विचार विद्यार्थी काँग्रेस ,युवक काँग्रेस, प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी ते आज जिल्हा काँग्रेसचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखले जात आहे.पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदारी पार पाडत आहेत व काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणूनच त्यांची जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्रात ओळख आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गव्हाणे यांनी केले आहे.
राजकिशोर मोदी यांना गेल्या महिन्यामध्ये पक्षाने उमेदवारी होती परंतु पक्षाचे आदेश मानून राजकिशोर मोदींनी आपला अर्ज मागे घेतला होता हीच पक्षनिष्ठा पक्षादेश ज्येष्ठ नेत्या मंडळीचा विश्वासू म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत.तरी गेलेली संधी पुन्हा राजकिशोर मोदींना द्यावी जेणेकरून जिल्ह्यातील काँग्रेसला व कार्यकर्त्याला बळ मिळेल व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन पाठबळ मिळेल तरी पक्षाने राजकिशोर मोदींना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत गव्हाणे आहे.

Sharing

Visitor Counter