कासारी बोडखा येथे महीलेचा विनयभंग चार जना विरूध्द गुन्हा दाखल

कासारी बोडखा येथे महीलेचा विनयभंग चार जना विरूध्द गुन्हा दाखल
धारूर/प्रतिनिधी
तालूक्यातील कासारी बोडखा येथील शेतीचे वादातून दिंद्रूड पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणूण महीलेस व घरच्या मंडळीना मारहान केल्या प्रकरणी चार जना विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
तालूक्यातील कासारी बोडखा येथील एक महीला पती सासू व मुला सह शेतात काम करून परतत असताना ग्रामपंचायत कार्यालया समोर शेतातील भांडण प्रकरणी पोलीसा कडे तक्रार का केलीस म्हणूण चार जनानी शिवीगाळ करून पतीस मारहान करत असताना सासू व फिर्यादी पत्नी सोडवण्यास गेले असता महीलेचा विनयभंग केला या प्रकरणी या महीलेने दिलेल्या तक्रारी वरून दिंद्रूड पोलीस स्टेशनला आरोपी अंगद बाबासाहेब बडे अकूंश बाबासाहेब बडे व्यंकट बन्सी बडे उत्तमराव देवराव बडे यांचे विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करत आहेत








