अल्पवयीन मुली वर अत्याचार एक जना विरूध्द गुन्हा दाखल आरोपी अटक

अल्पवयीन मुली वर अत्याचार एक जना विरूध्द गुन्हा दाखल आरोपी अटक
धारूर/प्रतिनिधी
पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी येथे अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून शेतात मजूरी साठी आलेल्या एकजनाने तिला धमकी देऊन सात महीण्या पुर्वी लैंगीक अत्याचार केला हा प्रकार मुलील दवाखान्यात घेऊन गेल्या वर उघड झाला भिती पोटी मुलीने काही सांगीतले नाही. हा प्रकार उघडा झाल्यास या अत्याचारीत मुलीचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक हि करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.
धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी येथे शेतात बाजरी काढण्या साठी आलेल्या एक जनाने डोंगरावर गावा पासून दिड कि.मी. अंतरावर असणारे शेतात अल्पवयीन अत्याचारीत मुलगी एकटी आल्याचे पाहून तिच्या वर लैंगिक अत्याचार केले व कोणाच सांगशील तर बघ आशी तिला धमकी दिली. हा प्रकार 2019 चे दिवाळी अगोदर घडला माञ या अल्पवयीन मुलीने कोणाला भिती पोटी सांगीतले नाही .दोन तिन दिवसा पुर्वी मुलीचे पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन गेले असता ति गर्भवती राहील्याचे लक्षात येताच तिचे वडीलानी तिला विचारले असता हा प्रकार सांगीतला संबंधीत अत्याचारीत अल्पवयीन मुलीचे तक्रारी वरून संबंधीत आरोपी सतिश सखाराम सरवदे वय 22 वर्ष यांचे विरूध्द बाल अपराध संरक्षण अधिनीयम 2012 कलम 376,506 भा.द. वि नुसार गुन्हा नोंदवीण्यात आला असून आरोपीस अटक हि करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत








