केज तालुक्यातल्या माळेगावचे चार जण तर बीडचा एक पाॅझिटीव्ह

केज तालुक्यातल्या माळेगावचे चार जण तर बीडचा एक पाॅझिटीव्ह
बीड : जिल्ह्यातून आज (दि. १७ जून) एकूण ५७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून ५२ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालानंतर केज तालुक्याला मोठा धक्का बसला आहे. पाच बाधितापैकी चार जण केज तालुक्यातील माळेगाव येथील असून एक जण बीडचा आहे.
केज तालुक्यातील माळेगाव येथील वृद्ध महिला औरंगाबाद मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आली होती. मंगळवारी त्या महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी त्या महिलेच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. यात ३६ वर्षीय महिला, ६० आणि ३८ वर्षीय पुरूष व १२ वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर, बीड मधील हिनानगर मधील ५२ वर्षीय पुरूषही आज पाॅझिटीव्ह आला. बीड जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० झाली आहे. सध्या बीड जिल्ह्यात २७ कोरोना प्रभावित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.








