धारूर महाविद्यालय एक दिवसीय ऑनलाइन अंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

Dharur

धारूर महाविद्यालय एक दिवसीय ऑनलाइन अंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

किल्लेधारुर/प्रतिनिधी

येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल संचालित, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इथे आज दिनांक 17 जून 2020 रोजी "माध्यम भाषा आणि साहित्याची सामग्री वर्धन आणि उपयुक्तता " या विषयावर अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन विभाग व मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागा द्वारे आयोजित एकदिवसीय अंतरराष्ट्रीय ऑनलाइन वेबीनार संपन्न झाला. मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार मा.श्री.प्रकाशदादा सोळंके ,सचिव आमदार मा श्री सतीश चव्हाण
(पदवीधर आमदार मराठवाडा विभाग) तसेच कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर येथील महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख मा श्री जयसिंग भैय्या सोळंके तसेच मा श्री लोभाजी चव्हाण (सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा श्री अजय सिंह दिखत (सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा श्री डॉ राम शिनगारे (सदस्य महाविद्यालय विकास समिती), मा श्री मुकुंद सावंत (सदस्य महाविद्यालये विकास समिति), मा श्री इंद्रजित जाधव (सदस्य महाविद्यालय विकास समिती), प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ उपप्राचार्य प्रा महादेव जोगडे यांच्या शुभेच्छांनी या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ हे या आंतरराष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. नेपाळ येथील डॉ. राज खडका यांनी बीज वक्ते म्हणून मार्गदर्शन केले ,त्यांनी येऊ घातलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसरे वक्ते डॉ विनोद कुमरे (मराठी विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई) त्यांनी मराठी भाषेचा मीडियावर होणारा परिणाम व आधुनिक मीडियामध्ये होत चाललेल्या बदलांवर भाष्य केले .तिसऱ्या सत्रात डॉ महेंद्र ठाकूरदास(माजी विभागप्रमुख हिंदी विभाग धारूर) यांनी लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक मूल्यावर आधारित शिक्षण पद्धती हवी असल्याचे मत त्यांनी मांडले, विविध संदर्भ देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. तर चौथ्या सत्रात डॉ के.वेंकट सतीश (इंग्रजी विभाग आयआयटी श्रीकाकुलम आंध्र प्रदेश) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. पाचव्या सत्रात डॉ वैजनाथ अनमुलवाड (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) यांनी माध्यमांमध्ये मराठी भाषा व उपयुक्तता या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले ,त्यांनी भाषेचा इतिहास व माध्यमांमध्ये वापरली जाणारी भाषा या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सहाव्या सत्रात डॉ अशोक जाधव (नांदेड) यांनी हिंदी साहित्यामध्ये माध्यमांची भूमिका या विषयावर आपले मत मांडले. या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये विविध महाविद्यालयातील विविध राज्यातील 744 प्राध्यापक संशोधक उपस्थित होते. या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ,उपप्राचार्य प्रा महादेव जोगडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ दिगंबर गंजेवार, तसेच ग्रंथपाल श्री जी डी सगर, हिंदी विभाग प्रमुख प्रा विनायक कापावार,डॉ नितीन कुंभार आदी यावेळी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ दिगंबर गंजेवार यांनी मानले.

Sharing

Visitor Counter