नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा धारूर राजमुद्रा संघटनेच्या वतीने सत्कार

नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा धारूर राजमुद्रा संघटनेच्या वतीने सत्कार
किल्ले धारुर/इरफान शेख
धारूर राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने मराठवाडा संपर्क प्रमुख पदी महेश अलाट यांची तर बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी बबलु सावंत यांची निवड झाल्या बद्दल आज राजमुद्रा सामाजिक संघट नेच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भव्य सत्कार संघटनेचे मार्गदर्शक सुरेश शेळके यांच्या हस्ते करण्यात आला
संपूर्ण महाराष्ट्रात आज राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जाळे पसरले आहे संस्थापक अध्यक्ष किशोर अप्पा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात सामाजिक कार्य करून संघटनेने नावलोकिक मिळवला आहे किशोर अप्पा पिंगळे व रणजित पिंगळे यांचे कट्टर समर्थक विश्वासू महेश भैय्या अलाट व बबलु सावंत यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीने धारूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे मोठे पद धारुर तालुक्याला मिळाल्याने कार्यकर्त्यांना मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे संघटनेचे कार्य तळमळीने करून किशोर अाप्पा पिंगळे यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांन पर्यंत पोहाचीनार असल्याचे सत्कार प्रसंगी महेश अल्लाट व बबलु सावंत यांनी सांगितले
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके, शुशिल शेळके, सचिन चीरके, पत्रकार नाथा ढगे, दिलीप सिरसट, सचिन सिरसट, ज्ञानेश्वर कदम, महेश गवळी, उमेश बोबडे, सोमनाथ बोबडे, संदीप बोबडे, विजय सिरसट, वळेकर सर, नाना शेरकर, सखाराम जगताप , अनिल जाडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते








