खड्यात रोड कि,रोड मध्ये खड्डा तेलगाव नाका ते नाळवंडी नाका रस्ता!

Beed

खड्यात रोड कि,रोड मध्ये खड्डा तेलगाव नाका ते नाळवंडी नाका रस्ता!

बीड/प्रतिनिधी

बीड शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना काही फिटेना तेलगाव नाका ते नाळवंडी नाका रस्ता हा गेल्या काही महिन्यांपासून खराब असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत . बीड शहरातील मुख्य रस्ता असलेला नाळवंडी नाका तेलगाव नाका या रस्त्यावरील खड्डयामुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळे होवू लागली आहेत तेलगाव नाका ते नाळवंडी नाका मोठ मोठे खड्डे पडले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून तात्काळ रस्ता दुरूस्त करण्यात यावा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन रस्त्यासाठी दरवर्षी राज्यशासन करोडो रुपये खर्च करत असून रस्त्याची दैना काही फिटत नाही . जी दुरावस्था रस्त्याची आहे तशीच कायम राहत असल्याने वाहनधारकांना विविध अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे . बांधकाम विभागाने हे खड्डे तात्काळ भरुन काढावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे

Sharing

Visitor Counter