कॅ.राजपालसिंह हजारी यांच्या पूण्यतिथी निमीत्त २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले

कॅ.राजपालसिंह हजारी यांच्या पूण्यतिथी निमीत्त २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
धारूर/इरफान शेख
धारूर शहरात बालाघाट पतिष्टानचे जागतीक रक्तदान शिबीर दि. १४/६/२०२०वार रविवार जागतीक रक्तदाता दिन व स्व.कॅ. राजपालसिंह हजारी (भैय्या) यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमीत्त प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी ही बालाघाट प्रतिष्ठाण चे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबीरात २०५ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री. माले साहेब, तहसीलदार श्रीमती शिडोळकर मॅडम,माजी आमदार केशवदादा आंधळे,स. पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पंचायत समीती सभापती हानुमंत बप्पा नागरगोजे,माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपसभापती प्रकाश दादा कोकाटे, भाजपा जेष्ठ नेते उदयसिंह दिख्खत,मा. नगरसेवक दिनेशसिंह हजारी, विलास भाऊ डुबे,डॉ.राम शिनगारे बालासाहेब जाधव ,डॉ.पी.एस.मुंडे,पत्रकार अनिल महाजन , प्रकाश काळे. सदानंद खिंडरे, संदिपान तोंडे, यांच्या प्रमूख उपस्थिती संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाघाट प्रतिष्ठाण चे सचिव दिपक पटवर्धन,संतोषसिंह पवार, सचिन दुबे, शेख एजाज, राजकुमार पिलाजी, भाजपा गटनेते रोहीत हजारी, नगरसेवक संतोष बप्पा सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, सुरेश लोकरे, बालाजी चव्हाण, रुपेश चिद्रवार, भैरू आण्णा शिनगारे, भाजपा शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे,युवा मोर्चा अध्यक्ष अॅड.मोहन भोसले रविशंकर कुंभार,लियाकत तांबोळी यांनी परिश्रम घेतले सर्व रक्तदात्या चे अभार बालाघाट प्रतिष्ठाण चे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांनी मानले








